आयपीएल 2022: ‘…यामुळेच CSK, MI ला आता कोणीही घाबरत नाही’ : रवी शास्त्री

0

आयपीएलच्या नव्या पर्वात (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन्ही दिग्गज संघांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे.

या दोन्ही संघांना पहिल्या चारही सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. यानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळ आयपीएची ट्रॉफी आपल्या नावे केलीये. तर चेन्नई सुपरकिंग्सनं चार वेळा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. परंतु हे दोन्ही संघ आयपीएल २०२२ च्या पर्वात आपल्या पहिल्या विजयासाठी झगडताना दिसत आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानांवर आहेत.

“मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघाना अन्य संघांनी मागे सोडले आहे. लिलावादरम्यान अनेक संघांनी चांगल्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. यामुळेच आता ते या दोन्ही संघांना घाबरत नाहीत,” असं शास्त्री ब्रॉडकास्टर्सशी बोलताना म्हणाले. “तुम्हाला काही संघांबद्दल माहिती आहे. हे दोन्ही संघ कधी गेममध्ये नव्हतेच हे अतिशय निराशाजनक आहे. चेन्नई आणि मुंबईबद्दल जी भिती होती ती आता नाहीये, कोणताही संघ त्यांना घाबरत नाही. हे मी आठवड्याभरापासून सांगतोय,” असंही ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:10 PM 11-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here