देवरुख येथील रिजन कॉन्फरन्स येथे लायन्स क्लब रत्नागिरीला मिळाले बेस्ट क्लबचे अवॉर्ड

0

◼️ बेस्ट प्रेसिडेंट म्हणून ला शबाना वास्ता सन्मानित

◼️ बेस्ट सचिव ला अभिजित गोडबोले तर बेस्ट खजिनदार ला गणेश धुरी

रत्नागिरी : डिस्ट्रिक्ट 3234D1रिजन 5 ची रिजन काँफरन्स देवभूमी देवरुख साडवली येथील हॉटेल लेझ्यर पॉइंट येथे रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रांतपाल एम जे एफ ला सुनीलजी सुतार ह्यांनी उद्घाटन केलेल्या विभागीय परिषदेत प्रमुख वक्त्या होत्या डॉ निधी पटवर्धन त्यांचे उद्बोधक भाषणानंतर रिजन मधील सर्व क्लब नी 1 जुलै पासून केलेल्या सेवाकार्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पारितोषिके जाहीर करण्यात आली.

भोजनानंतर लायन्स क्लब रत्नागिरीच्या उपस्थित सर्वच सभासदांनी बॅनर प्रेझेन्टेशन मध्ये सहभाग घेऊन भारतातील विविध धर्माच्या सणाचे सादरीकरण करून त्याचे लायन्स सेवाकार्याबरोबर नातं जोडून स्लोगन्सच्या फलकांचा वापर करण्यात आला. परिषदेमध्ये जी क्विज काँटेस्ट घेतली गेली त्यामध्ये रत्नागिरी क्लबचे ला ओंकार फडके विजयी होऊन त्यांना गोवा येथे होणाऱ्या प्रांतीय परिषदेमध्ये होणाऱ्या क्विज काँटेस्ट मधील प्रवेश निश्चित झाला.रिजन पाच झोन दोन चे झोन चेअरमन एमजेएफ ला प्रमोद खेडेकर ह्यांच्या कार्याबद्दल त्यांचा उचित सन्मान करण्यात आला.समाजामध्ये स्वतःच्या खबरदार माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या लायन हेमंत वणजू ह्यांचा ही यथोचित सत्कार करण्यात आला.

रीजन मधील प्रत्येक क्लबच्या सेवाकार्यानुसार अवॉर्डस देण्यात आली. ला शबाना वास्ता यांच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी क्लबला त्यांच्या गौरवशाली परंपरेला साजेशी सर्व सर्वोच्च पारितोषिके मिळाली त्यामध्ये बेस्ट ट्रेझरर ला गणेश धुरी, बेस्ट सेक्रेटरी ला अभिजित गोडबोले बेस्ट प्रेसिडेंट ला शबाना वास्ता! ही पारितोषिकके मिळत असताना खरा नेतृत्वाचा कस लागतो ज्यावेळी बेस्ट क्लब अवॉर्ड मिळते! क्लबचा सर्वांगीण अभ्यास करून दिले जाणारे हे पारितोषिक केवळ क्लबचे सारथ्य करणारा सारथी क्लबला सर्वोच्य पातळीवर कसा नेतो ह्यावर ठरते. सुरुवातीला नवख्या वाटणाऱ्या रत्नागिरी टीमने ला. शबाना ह्यांच्या नेतृत्वाखाली हे धनुष्य लीलया पेलले, रिजन मधील सर्वोत्कृष्ट बेस्ट क्लब ऑफ रिजन हे अवॉर्ड-लायन्स क्लब रत्नागिरीला मिळाले! प्रांतपाल,प्रथम उपप्रांतपाल,द्वितीय उपप्रांतपाल,अनेक माजीप्रांतपाल,रिजन मधील अनेक क्लबचे पी एस टी आणि सभासद ह्यांच्या उपस्थिती मध्ये हे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या क्लब चे अनेक सभासद उपस्थित होते.

त्यामध्ये ला ॲड शबाना वस्ता, ला गणेश धुरी, ला.अभिजीत गोडबोले, ला.पराग पानवलकर, ला.शिल्पा पानवलकर, ला.ओंकार फडके, ला.डाॅ संतोष बेडेकर, ला.प्रमोद खेडेकर, ला.सुनील देसाई, ला सुधीर वणजु, ला.यश राणे, ला.दत्तप्रसाद कुळकर्णी, ला.श्रद्धा कुळकर्णी, ला.ॲड मांडवकर, ला साक्षी धुरी, ला श्रेया केळकर, ला.हेमंत वणजू, ला.सौरभ मलुस्टे, ला गणेश भिंगार्डे, ला.विशाल ढोकळे ह्यांचा समावेश होता.

सूत्रसंचालन करण्याचा बहुमान ला श्रेया केळकर यांना मिळाला. त्याबद्धल त्यांचाही सन्मान करण्यात आला. लायन्स क्लब रत्नागिरीचे क्लब परिवार कडून आणि समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 12-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here