पिचडांच्या पक्षप्रवेशाने भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

0

मुंबई | राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधूकर पिचड यांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिचड हे धनगर आरक्षणाचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्याच्या भाजप प्रवेशाने सरकार धनगर आरक्षणाच्या बाजूने आहे की विरोधात?? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी प्रवर्गाला लागू असणाऱ्या काही योजना धनगर समाजालाही लागू होतील, मात्र आरक्षण केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्याचं राज्य सरकरने सांगितलं आणि त्याचवेळी पिचडांनी भाजपत प्रवेश केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, 2014 लाच धनगर आरक्षणाचा मार्गी लावणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र धनगर आरक्षणाचा अद्यापही प्रलंबित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here