मुंबई-गोवा हायवे बिल थकल्याने ठेकेदारांनी चौपदरीकरणाचे कामच बंद पाडले

0

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरण करणार्‍या कंपन्यांचे पैसे केंद्र सरकारने थकविले आहेत. त्याचा परिणाम चौपदरीकरणावर झाला आहे. चिपळून टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम कंपनीच्या पोट ठेकेदारीनी बंद पाडले आहे. ठेकेदारांची सुमारे दहा कोटीची बिले कंपनीने दिलेली नसल्याने ही कामे बंद पाडण्यात आली आहेत. पोटठेकेदारांनी कंपनीच्या व्यवस्थापकाबरोबर चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. महामार्गावरील परशुराम ते खेरशेत या 36 किलोमीटरचे काम चेतक एंटरप्राईजेस या कंपनीने घेतले आहे. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या कामातील काही भाग हा स्थानिक सात पोट ठेकेदारांकडून केला जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठेकेदारांची सुमारे दहा कोटींची बिले कंपनीने दिलेली नसल्याने संतप्त पोट ठेकेदारानी या टप्प्यातील ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती सर्व बंद केली. त्याचबरोबर कंपनीकडून काही ठिकाणी सुरू असलेली कामे बंद पाडली. कंपनीच्या कामथे येथील गेटवर डंपर उभा करून गेटही बंद केले आहेत. याबाबत माहिती देताना पोटठेकेदार महादेव कदम म्हणाले, कंपनीने आमच्याशी करार करताना पंधरा दिवसानंतर केलेल्या कामाचे पैसे दिले जातील असे ठरले होते. नऊ महिने झाले तरी अद्याप केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाही. सरकारकडून आम्हाला पैसे मिळत नाहीत. असे कंपनीकडून सांगितले जात आहे. पोट ठेकेदारांनी पदरचे पैसे टाकून कामे केली आहेत. काहींनी बँकेचे कर्ज काढले आहे. त्याचे हप्ते भरण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत. कंपनीने सरकारकडून पैसे घेवून आमची देणी द्यावी किंवा स्वतःच्या शेअर्समधून आमची देणी द्यावी. अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत काम करणार नाही आणि चौपदरीकरणाचे कामही चालू करू देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here