आयपीएल 2022: वॉशिंग्टन सुंदर पुढील दोन सामन्यांना मुकणार? हैदराबादला मोठा धक्का

0

गुजरात टायटन्सने सलामीचे तीन जिंकून अप्रतिम सुरूवात केली होती. पण अखेर सोमवारी गुजरातला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

सनराजयर्स हैदराबादने हंगामातील सलग दुसरा सामना जिंकत गुजरातचा पराभव केला. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केन विल्यमसनने ५७ धावांची दमदार खेळी करत हैदराबादला विजय मिळवून दिला. पण या दमदार विजयानंतर हैदराबादच्या संघाला एक मोठा धक्का बसला असून त्यांचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

हैदराबाद-गुजरात सामन्यादरम्यान अनुभवी फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. त्यामुळे त्याला सामन्यातील चार षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. एकूण तीन षटके टाकत त्याने १४ धावा दिल्या, पण त्याला विकेट घेता आली नाही. त्याच्या दुखापतीबाबत, सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले की, सुंदरला उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये आणि पहिल्या बोटाच्या मध्यभागी दुखापत झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवणार आहोत. आशा आहे की बळावणार नाही. पण त्याला पूर्णपणे तंदुरूस्त होण्यास किमान एका आठवड्याचा कालावधी लागेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 12-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here