कोरोनासदृश लक्षणे आढळणारे ७ संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल

0

रत्नागिरी: संपूर्ण जगात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूचे जिल्हा शासकीय रुग्णालयात ७ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. ते पुणे व ठाणे येथून जाऊन आल्याने त्यांना कोरोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने हे सातही जण स्वतःहून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात परदेशातून ५२ जण आले असून त्यांना खबरदारी म्हणून घरीच थांबण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना संशयितांना सर्दी-खोकल्याचा त्रास असल्याने ते खबरदारी म्हणून दाखल झाले आहेत. परिस्थिती पाहून त्यांच्या थुकीचे व थ्रोटचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here