आता रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांना शंभर रुपयांच्या हप्त्यावर मिळणार दुचाकी

0

रत्नागिरी : तब्बल ४० वर्षांची दैदिप्यमान वाटचाल असणाऱ्या राधाकृष्ण नागरी पतसंस्थेने काढलेल्या एका कर्ज योजनेची साऱ्या शहरात चर्चा ऐकायला मिळत आहे. आधुनिकतेची कास धरत नवनवीन आकर्षक योजना काढत आता राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था ग्राहकांना आकर्षित करीत आहे. अवघ्या १०० रुपयांच्या प्रतीदिन हप्त्यावर आता शहरातील व्यापाऱ्यांना दुचाकीसाठी कर्ज देण्यात येत आहे. या कर्ज योजनेचा शुभारंभ रत्नागिरीतील प्रथितयश उद्योजक यश गांधी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यश गांधी हे गांधी ऑटो एजंसिज चे मालक असून त्यांनीच या नावीन्यपूर्ण योजनेसाठी पुढाकार घेतला आहे.


राधाकृष्ण नागरी सहकारी पत संस्थेने रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांसाठी ही योजना आणली आहे. या योजनेनुसार दुचाकी वाहन घेण्यासाठी व्यापाऱ्यांना कर्ज देण्यात येणार असून या कर्जाची परतफेड करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रती दीन फक्त १०० रुपये द्यावे लागणार आहेत. पतसंस्थेचा प्रतिनिधी दर दिवशी कर्जदार व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन १०० रुपये संकलित करणार आहे. या कर्ज योजनेत व्याजाची आकारणी देखील अत्यंत कमी दराने होणार आहे. शिवाय मुदतपूर्व रक्कम भरल्यास व्याज देखील त्यानुसार कमी होणार आहे. अत्यंत सुलभ पद्धतीने व्यापारी या कर्जाची परतफेड करू शकतात. योजनेच्या अधिक माहितीबाबत हॉटेल प्रभाच्या मागे असणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात व्यापाऱ्यांनी संपर्क साधावा व योजनेचा फायदा जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन राधाकृष्ण नागरी सहकारी पत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 13-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here