तळवडे विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विजय पाटोळे यांची बिनविरोध निवड

0

लांजा : तालुक्यातील तळवडे विकास सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत चेअरमनपदी विजय पाटोळे, तर व्हॉईस चेअरमनपदी मनोहर गरव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक दुय्यम निबंधक श्रद्धा भाटकर यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामविकास मंडळ तळवडेचे अध्यक्ष पर्शराम पाटोळे, सरपंच संजय पाटोळे, सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर पाटोळे, दिलीप पाटोळे, उमाकांत पाटोळे, शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी प्रयत्न केले. नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सोसायटीच्या सचिव सौ. राणे, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष पशुराम पाटोळे, माजी चेअरमन मनोहर पाटोळे, बजरंग पाटोळे, पांडुरंग सावंत, अनिल कनावजे आदी सभासद उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:03 PM 13-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here