मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपिट

0

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दि. १७ ला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वार्‍यासह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उस्मानाबाद,जालना, वाशिम, कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या तिथल्या वार्ताहरांनी कळवलं आहे. आज विदर्भात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अशाच पावसाची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसात वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपिट झाल्यानं शेतीतील पिकाचे नुकसान झालं, गहू हरभरा यासह फळबागाची हे नुकसान झाल्यानं 300 हेक्टरच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस जाल्यानं काढणीस आलेल्या गहू, हरभरा, मका आदी पिकांसह द्राक्ष, डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालं. आंब्याचा बहरही गळून पडला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here