सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घोरपडीवर अत्याचार प्रकरणी चौघांना अटक

0

गोठणे : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे घोरपडीवर अत्याचार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

एका वनअधिकाऱ्यानं यासंदर्भात बुधवारी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गोठणे गावात घडली होती. त्यांनी सांगितलं की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातंर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यानात अवैध स्वरुपात प्रवेश केल्याप्रकरणी आरोपींविरोधात 31 मार्च रोजी प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला होता. सध्या आरोपींची चौकशी सुरु आहे.

विनापरवाना शस्त्रासह घुसलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एका धक्कादायक माहितीचा खुलासा झाला होता. या आरोपींनी एका घोरपडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपींचे मोबाईल तपासले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

काही शिकारी कोकणातून कोल्हापुरातील चांदोलीमध्ये शिकारीसाठी आले होते. व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कमेर्‍यामुळे या शिकारींना अटक करण्यात वनविभागाला यश मिळालं होतं. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. एका आरोपीनं घोरपडीवर बलात्कार केला असून त्यावेळचे चित्रिकरण मोबाईलमध्ये करण्यात आले होते. आता त्यावरुनच या आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र वनविभागासमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे, या आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद करायचा.

एसटीआरचे क्षेत्र संचालक नानासाहेब म्हणाले की, चार आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बंगाल मॉनिटर’ हा भारतीय उपखंडात तसेच अग्नेय आशिया आणि पश्चिम आशियाच्या काही भागांमध्ये आढळणारा एक मोठी घोरपड आहे. ही मोठी घोरपड प्रामुख्यानं जमिनीवर राहतो आणि त्याची एकूण लांबी सुमारे 61 ते 175 सेमी (24 ते 69 इंच) असते.

राजस्थानमध्ये काही वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. आठ जणांनी एका पाळीव शेळीवर बलात्कार केला होता. त्यावर आरोपींना शिक्षा झाली होती. मात्र शेळी ही पाळीव प्राणी आहे, घोरपड ही वन्य प्राणी आहे. त्यामुळे यावर अमरावतीच्या एका तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. कोल्हापुरात गोठणे येथे घडलेला प्रकार हा अत्यंत किळसवाणा असून आतापर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 14-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here