धन्वंतरी रुग्णालयात आहारासंदर्भात मार्गदर्शन

0

रत्नागिरी : आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आजच्या काळात गरजेचे आहे. परंतु त्यासाठी महागड्या औषधांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने आहारातून ती वाढवणे शक्य आहे. याचे मार्गदर्शन शिवाजीनगर येथील धन्वंतरी रुग्णालयात नाशिकचे प्रसिद्ध आहारतज्ञ नितीन दाढे करणार आहेत. आज बुधवारपासून ते २० मार्चपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत उपलब्ध होतील. सध्या विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या आजारांसाठी वेगवेगळी औषधे वापरली जातात. आहाराचे नेमके तत्त्व सांगण्यासाठी नितीन दाढे येणार आहेत. ट्रिनिटी हेल्थ क्लबच्या माध्यमातून अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होणार आहे. अधिक माहितीसाठी धन्वंतरी रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here