मिरजोळे जि. प. गटातील सर्व गावांमधली शहरी बस वाहतूक लवकर पूर्ववत करा; मिरजोळे युवासेनेची मागणी

0

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. उदय सामंत, महा. क्रिकेट असो सदस्य, तथा जिल्हा अध्यक्ष भैयाशेठ सामंत, शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंडया शेठ साळवी, उप जिल्हा प्रमुख तथा मिरजोळे जि. प सदस्य बाबूशेठ म्हाप तसेच युवासेना तालुका अधिकारी तुषार साळवी, यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजोळे जि. प गटातील सर्व गावामधील शहरी बस वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आगार व्यवस्थपकांना युवासेने तर्फे निवेदन देण्यात आले.

अनेक महिने चालू असलेला एसटी कर्मचारी यांनी संप आता मागे घेतला असुन, तत्पूर्वी गेले अनेक महिने संपामुळे शहरी बस वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने विदयार्थी, कर्मचारी, इतर प्रवासी यांची मोठया प्रमाणात गैरसोय होत होती. एसटी कर्मचारी यांचा संप आता मिटल्यामुळे आता कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. त्यामुळे मिरजोळे जि. प. भागातील मिरजोळे, शीळ, केळये मजगांव, फणसवळे, दांडे -भावे आडोम, सडये पिरंदवणे, आदि भागातील शहरी बस वाहतूक लवकरात लवकर चालू करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी युवासेना मिरजोळे तर्फे आगार व्यवस्थापक श्री. शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

मिरजोळे तसेच इतर भागातील सर्वच शहरी बस वाहतूक फेऱ्या लवकरात लवकर चालू करण्यासाठी चे आश्वासन आगार व्यवस्थापक यांनी दिले.

यावेळी युवासेना उप तालुका अधिकारी देवदत्त पेंडसे, विभाग अधिकारी विकास सनगरे, युवासेना उप विभाग अधिकारी संदीप नाखरेकर, योगेश कातळकर, पनू वायंगणकर, सुबोध रेवाळे, अनिकेत शिवलकर, संजीवन शिवलकर आदि मिरजोळे गटातील युवासैनिक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:33 PM 14-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here