डेरवण यूथ गेम्समध्ये तळवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0

लांजा : डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टने डेरवण येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय यूथ गेम्स स्पर्धेत १८ वर्षांखालील लंगडी, खो-खो या क्रीडा प्रकारात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश मिळवले.

डेरवण यूथ गेम्स स्पर्धेत तालुक्यतील तळवडे येथील पेडणेकर स्पोर्ट्स क्लबच्या पेडणेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यात १२ वर्षांखालील मुली लंगडी प्रथम व १८ वर्षांखालील खो-खो मुली चतुर्थ क्रमांक मिळवला. त्यांनी एकूण २२ हजार रुपयांची पारितोषिके प्राप्त केली.

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लंगडी, खो-खो या क्रिडाप्रकारात यश मिळविलेल्या या विजयी संघांचे तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष आनंद पेडणेकर व पदाधिकारी, स्थानिक, शाळा समिती, सरपंच कमिटी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले.

खो-खो गटात रसिका, गौरी, स्नेहा, श्रृती, रेश्मा, साक्षी, सायली, दिक्षा, आरती यांनी, तर लंगडी लहान गटात तन्वी, सृष्टी, शर्वरी, कस्तुरी, गायत्री, गौरी, जान्हवी, उज्वला यांनी सुंदर खेळ केला. शाळेचे मुख्याध्यापक भीमराव खोत आणि शिक्षकांनी याकामी मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here