जिल्ह्याची अॅलर्जी असल्याप्रमाणे पालकमंत्री जिल्ह्यापासून दूर – अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी: संपूर्ण जगभर कोरोनाचे थैमान सुरु आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्याची अॅलर्जी असल्याप्रमाणे पालकमंत्री रत्नागिरीत फिरकत नाहीत, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री रत्नागिरीत येवूनही आढावा बैठक मात्र सिंधुदुर्गात झाली तोच कित्ता पालकमंत्री गिरवत आहेत आणि रत्नागिरीवर अघोषित बहिष्कार घातला आहे असे म्हणावे असे वाटते, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली. रत्नागिरीमध्ये मास्कचा, सॅनेटायझरचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयाची अवस्था पहाता जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा आढावा घेवून उपाययोजना तसेच स्थानिक डॉक्टर्स, हॉस्पिटल चालक यांच्यामध्ये समन्वय करून कोरोना संदर्भान उपाययोजना करणे गरजेचे आहे. औषधोपचाराबाबत केमिस्ट, ड्रगीस्ट यांच्याबरोबर बैठक घेणे, अनेक महत्वाच्या विषयांची हाताळणी पालकमंत्र्यांनी बैठका घेवून करणे अपेक्षित होते. मात्र, पालकमंत्री रत्नागिरीकडे फिरकलेले नाहीत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here