खेडमध्ये लागोपाठ दोन अपघात; खासगी बस पाठोपाठ तवेरा पलटी होऊन सातजण जखमी

0

खेड : तालुक्यातील कळंबणी वाळंजवाडी येथे खासगी बस पाठोपाठ आणखी एक अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या अपघातात तवेरा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी होऊन सातजण जखमी झाले आहेत.

मुंबईहून जयगड येथे जायला निघालेली तवेरा कार महामार्गावरील कळंबणी वाळंजवाडी येथे आली असता चालकाचा ताबा सूटला आणि भरधाव वेगातील तवेरा कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली या अपघातातील जखमीना ही कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात देखील सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी माध्यमांशी बोलताना सांगितले. खेड पोलीस घटनास्थळी पंचनाम्याची रवाना झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 15-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here