पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघटननेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या अफवेत चिकन विक्री आणि वितरण पद्धतीवर पडलेल्या प्रभावामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची भरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा पोल्ट्री संघटनने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात गेल्या महिन्याभरात चिकन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असून कोरोनाचा संबंध नसताना उठवलेल्या अफवांमध्ये जबाबदार असणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. गेल्या महिन्याभरातील पोल्ट्री व्यवसायातील उलाढालच ठप्प झाली. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा पोल्ट्री संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here