मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगमुळं 10 पैकी 8 कुटुंबं कोरोनापासून सुरक्षित, सर्व्हेतून माहिती

0

नवी दिल्ली : देशात आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत मात्र एक वेळ अशी होती की देशात कोरोनानं भयंकर स्थिती निर्माण केली होती. या काळात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगनं अनेकांना कोरोनापासून दूर ठेवलं आहे.
एका सर्वेक्षणानुसार असा दावा करण्यात आला आहे की, भारतात 10 पैकी 8 कुटुंबं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावल्यामुळं कोरोना प्रादुर्भावापासून बचावली आहेत. हे सर्वेक्षण लोकल सर्कलनं भारतातील 345 जिल्ह्यांमध्ये केलं आहे. याक जवळपास 29 हजार लोकांनी सहभाग घेतला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

लोकल सर्कलनं दावा केला आहे की, या सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की, 57 टक्के भारतीय कुटुंबातील कमीत कमी एक किंवा दोन लोकांना गेल्या दोन वर्षात कोरोना झाला आहे. मास्क लावल्यामुळं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्यामुळं कोरोनाला आटोक्यात आणण्यात यश आलं असल्याचं म्हटलं आहे.

सर्वेक्षणात सहभागी 10,200 लोकांपैकी 57 टक्के लोकांनी म्हटलं आहे की, महामारीमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत गेल्या दोन वर्षात त्यांच्या परिवारातील एक किंवा त्याहून अधिक सदस्य कोरोनाबाधित झाले. 10 पैकी 8 कुटुंबं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावल्यामुळं कोरोना प्रादुर्भावापासून बचावली. त्यांच्या परिवारातील कुठलाही सदस्य कोरोनाबाधित झाला नाही कारण त्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं.

कोरोनाबाधित न झालेल्या लोकांचं विश्लेषण केलं असता असं समोर आलं आहे की, त्यातील 80 टक्के लोकांनी कोरोना महामारीत सामाजिक संपर्क कमी केला, मास्क लावला आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 53 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांनी महामारीच्या काळात आपली दिनचर्या व्यवस्थित पाळली, तसेच घरामध्ये सक्रिय राहत व्यायामावर लक्ष केंद्रीत केलं.

या सर्वेक्षणात सहभागी लोकांमध्ये 61 टक्के पुरुष तर 39 टक्के महिलांचा समावेश होता. यातील 45 टक्के लोकं प्रथम श्रेणीतील शहरांमधील, 31 टक्के द्वितीय श्रेणीतील शहरातील तर 24 टक्के लोकं तृतीय श्रेणीतील शहरं आणि गावखेड्यातील होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:50 PM 15-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here