एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा सेमिनार

0

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात राष्ट्र सेवादल आणि लक्ष करिअर अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक नीलेश निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करावी, अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरावीत, अभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शन केले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी कबीर पळशीकर, डॉ. आशा जगदाळे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here