आमच्याकडे कोरोनाचा एकही रुग्ण नाही; किम जोंगचा दावा

0

प्‍योंगयांग – कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 7500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना संसर्ग झाला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील अनेक देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, किम जोंग उनच्या क्रौर्याची अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यावर त्याच्यावर उपचार करण्याऐवजी किम जोंग यांनी त्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. मात्र आता त्यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही असा अजब दावा केला आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र उत्तर कोरियाने केलेल्या या अजब दाव्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. उत्तर कोरियात एकाही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. किम जोंग उन यांनी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जानेवारीमध्येच देशाची सीमा बंद केली होती, शिवाय व्यापार आणि पर्यटनावर आधीच नियंत्रण आणले होते अशी माहिती मिळत आहे. मात्र हे असंभव असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच उत्तर कोरिया रुग्णांची माहिती लपवत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच किम जोंग यांनी कोरोना रुग्णाला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. कोरोना व्हायरस हा उत्तर कोरियामध्ये पसरू नये यासाठी त्याला थेट गोळ्या घाला असा आदेश किम जोंग यांनी दिला. उत्तर कोरियातील एक व्यक्ती कामानिमित्त चीनमध्ये गेली होती. त्यावेळी तिथे त्याला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती चीनमध्ये परतली. या व्यक्तीमुळे इतर लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here