कोरोना संकटकाळातही राजापूर तालुका कुणबी पतपेढीची यशस्वी घोडदौड : प्रकाश मांडवकर

0

राजापूर : सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे सर्व क्षेत्राला फार मोठा आर्थिक फटका बसलेला असताना येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी ने कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे सुरु असलेले लॉकडाऊन, बाजारातील मंदी, वाढती स्पर्धा या सर्वांवर यशस्वी मात करत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी बजावली आहे.

या आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी २० लाखाचा ढोबळ नफा झाला असून कोअर बँकिंग प्रणालीद्वारे लोकाभिमुख कामकाज करताना संस्थेने सभासदांचा विश्वास वाढवला असल्याची माहिती पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी दिली.

पतसंस्थेने संकटकाळातही योग्य नियोजन आणि अहोरात्र मेहनत घेत कर्ज वितरण, कर्जवसुली, ठेवी अशा सर्वच स्तरावर प्रगती साधली आहे. संस्थेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ९४३ सभासद वाढ होऊन एकूण सभासद संख्या १०७९९ इतकी झाली. सदरची सभासद वाढ १० % इतकी आहे. वसूल भागभांडवलामध्ये रक्कम रु.३६ लाख ने वाढ होऊन एकूण वसूल भागभांडवल रु. २ कोटी ४२ लाख इतके झाले आहे. सदरची वाढ १८ % इतकी आहे. निधी मध्ये रक्कम रु. ४९ लाखाने वाढ होऊन एकूण निधी रु. ३ कोटी २७ लाख इतके झाले आहे. सदरची वाढ हि १८% इतकी आहे. गुंतवणूका मध्ये रक्कम रु. २ कोटी ७७ लाख ने वाढ होवून एकूण गुंतवणुका रु. १६ कोटी ६१ लाख इतक्या झाल्या आहेत. सदरची वाढ ही २०% इतकी आहे. ठेवी मध्ये रक्कम रु. ८ कोटी २ लाखाने वाढ होऊन एकूण ठेवी रक्कम रु. ४५ कोटी १० लाख इतक्या झाल्या आहेत.

सदरची वाढ हि २२ % इतकी आहे. कर्जा मध्ये रक्कम रु. ६ कोटी ५२ लाखाने वाढ होऊन एकूण कर्ज हि रु. ३३ कोटी ५३ लाख इतकी आहेत. सदरची वाढ हि २४ % इतकी आहे. खेळत्या भागभांडवलात रक्कम रु. ९ कोटी ४१ लाखाने वाढ होऊन एकूण खेळते भागभांडवल रु. ५२ कोटी ७५ लाख इतके झाले आहे. सदरची वाढ हि २२ % इतकी आहे. एकत्रित व्यवसायात रक्कम रु. १४ कोटी ५३ लाखाने वाढ होऊन एकूण एकत्रित व्यवसाय ७८ कोटी ६३ लाख इतका झाला आहे. सदरची वाढ हि २३ % इतकी आहे. ढोबळ नफा १ कोटी २० लाख इतका झाला आहे. त्यामधुन आवश्यक तरतुदी करून निव्वळ नफा ७० लाख ०५ हजार इतका झाला आहे. यातून सभासदांना १२ टक्के प्रमाणे लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे.

वसुलीचे प्रमाण ९९ % राखताना सलग २३ वर्षे संस्था ‘अ ‘ ऑडीट वर्ग मिळवत आली आहे. सीडी रेशो ६६.५२ % तर ढोबळ एनपीए ०.९० टक्के तर एनपीए शुन्य टक्केची ची परंपरा कायम राखली आहे.
संस्थेच्या तालुक्यात आठ शाखा व प्रधान कार्यालय आहे. सर्व शाखा नफ्यात असून मे महिन्यात लांजा तालुक्यातील भांबेड व सापुचेतळे , रत्नागिरी तालुक्यात पाली आणि संगमेश्वर तालुक्यात साखरपा या शाखा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मांडवकर यांनी दिली. तसेच शाखा भु , आडिवरे यांची कर्ज वसुली १०० % इतकी राहिली आहे. शाखा पाचल , ओणी , कोंड्ये , सागवे यांची कर्जवसुली ९९.७५ % पेक्षा जास्त असून समाधानकारक प्रगती असल्याची बाब मांडवकर यांनी नमुद केली.

संस्थेच्या कामकाजाची दखल घेऊन संस्थेला अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इन्मा यांचा ‘बँको’ तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचा ‘दीपस्तंभ’ असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती श्री. मांडवकर यांनी दिली.

यावेळी विद्यमान कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपल्याने मागील मागील ६ वर्षात संचालक मंडळाची कामगिरीचा आढावा मांडवकर यांनी घेतला. या सहा वर्षात सर्वच संचालकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पतपेढीची उल्लेखनीय भरभराट झाल्याचे मांडवकर यांनी सांगितले. सहा वर्षात सभासद मध्ये वाढ ३३९७ इतकी असून सदरची वाढ हि ४६ % इतकी आहे. वसूल भाग भांडवल मध्ये वाढ रु. १ कोटी ४९ लाख इतकी असून सदरची वाढ हि १६०% इतकी आहे . निधी मध्ये वाढ रु. १ कोटी ९३ लाख इतकी असून सदरची वाढ हि १४४ % इतकी आहे .

ठेवी मध्ये वाढ रु. ३१ फोटी १९ लाख इतकी असून सदरची वाढ हि २२४ % इतकी आहे. कर्जामध्ये वाढ रु. २३ कोटी ५१ लाख इतकी असून सदरची वाढ हि २३५ % इतकी आहे. गुंतवणुका मध्ये वाढ रु. १० कोटी ६२ लाख इतकी असून सदरची वाढ हि १७७ % इतकी आहे. खेळत्या भाग भांडवलात वाढ रु. ३५ कोटी ३३ लाख इतकी असून सदरची वाढ हि २०३% इतकी आहे. एकत्रित व्यवसायात वाढ रु. ५४ कोटी ६ ९ लाख इतकी असून सदरची वाढ हि २२८% इतकी आहे. दोबळ एनपीए १०% वरून १ % इतका कमी करण्यात आला तसेच नेट एनपीए ९% इतका करण्यात आला.
संस्थेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा असे करण्यात आले आहे.

तर सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबीर , शासकीय उपक्रमात सहभाग म्हणून वनराई बंधारे बांधणे, कोविड कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला मदत, विविध संस्थाना मदत करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, स्थानिक कमिटी, व्हा. चेअरमन बाळकृष्ण तांबे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, कर्ज वसुली अधिकारी श्रीकांत राघव, माजी संचालक, सीए श्री . पाटणकर, अॅ ड. एस. एम. देसाई, सीए धीरज देशपांडे , शाखाधिकारी , कर्मचारी , पिग्मी व आरडी एजंट या सर्र्वाचा मोलाचा सहभाग लाभला. ज्या सभासदांनी कोविड-१९ च्या काळातही कर्ज हप्ता भरणा केला व संकटकाळातही संस्थेच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावला त्याबद्द मांडवकर यांनी धन्यवाद व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 16-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here