विचार करून शब्द द्यायला हवा, चंद्रकांतदादांची विश्वासहर्ता आता राहीलेली नाही : एकनाथ खडसे

0

मुंबई : कोल्हापूरच्या उपनिवडणुकीत चंद्रकात दादा पाटलांनी हिमालयात जाण्याचा शब्द काही क्षणात फिरवला असून भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिलेला हा शब्द इतक्या लवकर फिरवणे याबाबत आश्चर्य वाटत असल्याची टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

”चंद्रकांत दादांनी शब्द देताना विचार करायला हवा होता, अथवा त्याचे पालन करावयास हवे होते. मात्र चंद्रकांत दादांनी अनेक वेळा अशा घोषणा केल्या, त्यांची ते अंमलबजावणी करत नाही. यामुळे त्यांची यापुढे विश्वासहर्ता राहीलेली नाही, अशी टिका देखील एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत दादांवर केली आहे.

कोल्हापूरचा विजय हा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातुन महत्वाचा आणि राजकारणीची भावी दिशा ठरवणारा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकदिलाने लढले तर कोणत्याही पक्षाचा पराभव करू शकतात यातून दिसून आले आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात अशाच पद्धतीने एकत्र चालण्याची गरज खडसेंनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत हिदुत्ववादाचा मोठा वापर केला गेला मात्र जनता सुज्ञ होती. भाजप हा हिदुत्वाचा वापर राजकारण आणि निवडणुकांपुरता करतो. त्यामुळेच त्यांचा हा आताताईपणा मतदारांनी नाकारल्याचे मत खडसेंनी व्यक्त केलं.

हनुमान चालीसा म्हणने हा हिंदुचा अधिकार, मात्र कधी म्हणावी याबाबत काही नियमावली आहेत. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हनुमान चालीसाचा उपयोग अयोग्य असल्याचे मतही खडसेंनी व्यक्त केलं आहे. गुजरात मधुन एका लग्न कार्यक्रमातून परतत असतांना त्यांनी आज नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या अध्यक्षांच्या घरी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 16-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here