कुवारबाव येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला रेल्वेस्टेशन येथे अटक

0

त्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री २.१५ ते २.२९ वा. सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशनहून अटक केली.

आसिफ उस्मान डांगे (वय १९, रा. बत्तीसशिराळा, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत मंगेश मोहन चाळके (३७, रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी पोलिसांना खबर दिली.

त्यानुसार, कुवारबाव येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम कॅश बॉक्सचा पुढील लोखंडी दरवाजा अर्धवट उघडून कोणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित डांगेला अटक केली. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 18-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here