खेड, चिपळूण आगारात एसटी कर्मचारी संपावरून रुजू

0

रत्नागिरी : खेड आणि चिपळूण एसटी आगारातील संपावरील कर्मचारी हळूहळू सेवेत रुजू होऊ लागले आहेत. परिणामी आगारातील बसफेऱ्याही वाढू लागल्या आहेत.

खेड बसस्थानकात सुमारे १५० हून अधिक कर्मचारी सेवेत हजर झाले. दोन दिवसांत ६२ बसफेर्यांची वाढ झाली आहे. दररोज ८० बसफेऱ्या धावत असून, दिवसाला सुमारे अडीच लाखांचे उत्पन्न आगाराला मिळू लागले आहे. सध्या खेड-चिपळूण, खेड- रत्नागिरी, खेड-दापोली, खेड-मंडणगड, खेड-मुंबई, खेड-स्वारगेट, खेड-नालासोपारा, खेड-बोरिवली, खेड-बोरिवली (तुळशीमार्गे), खेड-पिंपरी चिंचवड आदी बसफेर्या धावत आहेत. एसटी कर्मचारी हळूहळू हजर होऊ लागले आहेत. येत्या काही दिवसात ही संख्या वाढणार आहे. यामुळे दोन-तीन दिवसांत ग्रामीण भागात बसफेर्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती खेड आगारप्रमुख प्रशांत करवंदे यांनी दिली.

दरम्यान, एसटी बसेसचे दर दोन-तीन वर्षांनी आरटीओ कार्यालयाकडून पासिंग करून घेतले जाते. त्यानुसार चिपळूण आगारातील ४० बसेसचे पासिंग रखडले असल्याने सध्या कार्यशाळेत त्या उभ्या करून ठेवण्याची वेळ आली आहे. चिपळूण आगारात ९२ एसटी बसेस असून ४० बसेस वापराविना उभ्या असल्याने शिल्लक बसगाड्यांवर आगाराला प्रवासी सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळे या बसेस पासिंग होणे महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास रुजू होणाऱ्या कामगारांना फेऱ्यांसाठी बसेस अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:07 PM 18-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here