➡ नगराध्यक्षांनी घेतला कामाचा आढावा
नवीन नळपाणी योजनेच्या वाहिनीद्वारे शीळ धरण ते साळवी स्टॉप येथे पाणी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत ही जलवाहिनी सुरू होण्याची शक्यता आहे. ही जलवाहिनी सुरू झाल्यावर साळवी स्टॉप येथील टाकीत पुरेसे पाणी जमा होऊन त्याद्वारे संपूर्ण शहराला योग्य दाबाने पाणीपुरवठा करणे नगरपालिकेला शक्य होणार आहे. आज या कामाचा आढावा नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शीळ येथे जाऊन घेतला.

