काजळी नदीतील गाळ उपशाला प्रारंभ

0

रत्नागिरी : तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीतील गाळ उपसायला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे परिसरात गावांनी नि:श्वास सोडला आहे. काजळी नदीतील गाळाचा प्रश्न वर्षानुवर्षे गंभीर असून हरचिरी-चांदेराई या गावांना दरवर्षी पुराच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. काजळी नदीतील या दोन गावांच्या हद्दीतील गाळ प्रथमच उपसला जाणार असून यासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील ग्रामस्थांची व्यथा जाणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गाळ उपशाचा प्रश्न मार्गी लावला आहे.

चांदेराई पूल ते एमआयडीसी धरणापर्यंत गाळामुळे अनेक छोटी बेटे तयार झाली असून त्यात झाडेही वाढली आहेत. या बेटांमुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले असून काही ठिकाणी विभागलेही गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाचा तडाखा आजुबाजूला बसत आहे. या नदीतील गाळ उपसावा, यासाठी दोन्ही गावांतील ग्रामस्थांकडून वारंवार मागणी केली जात होती.

काजळी नदीला येणार्या पुरामुळे चांदेराई-हरचिरी भागात पुराचे पाणी घुसून बाजारपेठ व शेतीचे नुकसान गेली अनेक वर्ष होत आहे. परंतु या नदीतील गाळ अद्यापपर्यंत उपसण्याला मुहूर्त सापडला नव्हता. आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.

पाटबंधारे विभागामार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या नदीच्या पातळीत दहा फुटांची खोदाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापर्यंत जेवढे काम शक्य होणार आहे. आता कामाला सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 19-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here