आरडीसीसीकडील ठेवी काढून घेण्यास जि. प. सदस्यांचा तीव्र विरोध

0

रत्नागिरी : येस बँकेची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग कराव्यात असे आदेश काढले आहेत. याला रत्नागिरीतील जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकांकडील ठेवी काढून राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवल्यामुळे एक कोटी रुपयांच्या उत्पन्नावर जिल्हा परिषदेला पाणी फेरावे लागू शकते, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी आणि त्यावर तोडगा काढावा असा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये लेखाधिकाऱ्यांनी शासनाकडून आलेले बँक ठेवी बदलण्यासंदर्भातील पत्र मांडले. येस बँक बुडीत निघाल्यामुळे सर्व ठेवी राष्ट्रीयकृत बँकात ठेवण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here