जागतिक पटलावरील चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची जयंतीदिनानिमित्त २२ पासून आर्ट व्हिजन ग्रुपतर्फे मुंबई येथे चित्र प्रदर्शन ठरणार लक्षवेधी

0

◼️ रत्नागिरीचे चित्रकार अर्जुन माचिवले यांचा पुढाकार

जाकादेवी/संतोष पवार : जागतिक पटलावरील अजरामर ठरलेले अष्टपैलू चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची यांच्या जयंतीनिमित्त १० वे आर्ट व्हिजन (चित्रकला प्रदर्शन) २२ ते २४ एप्रिल या तीन दिवसीय कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ वा.पर्यंत पु.ल. देशपांडे कला अकादमी आर्ट गॅलरी सिद्धिविनायक मंदिर सयानी रोड प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनात रत्नागिरीचे निलेश पावसकर, दिगंबर मांडवकर, रमेश गंधेरे, अर्जुन माचिवले या चार नामांकित कलारांचाही समावेश आहे.

सदर प्रदर्शन आर्ट व्हिजनच्या माध्यमातून कालाप्रेमींना पाहण्याची सुवर्णसंधी विनामूल्य मिळणार आहे.

2012 मध्ये रत्नागिरी तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडीचे थोर कलाप्रेमी तरवळ गावातील सुपुत्र व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले प्रख्यात कलाध्यापक अर्जुन माचिवले व त्यांचे जिवलग सहकारी महेश कदम, रियाज काझी यांच्या अथक प्रयत्नाने आर्ट व्हीजनची स्थापना झाली. अर्जुन माचिवले हे स्वतः हाडाचे कलाध्यापक आहेत. विद्यार्थ्यांच्या उपजत सुप्त गुणांच्या विकासासाठी तसेच नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी झटत असतात,एवढेच नव्हे तर स्वतःच्या आंतरिक कलागुणांना योग्य कलापीठ उपलब्ध व्हावे ,म्हणून महाराष्ट्रातील निवडक कलाशिक्षकांना एकत्र घेऊन अर्जुन माचिवले सरांनी तसेच त्यांच्या सहकारी कलाकारांनी अनेक नजरेत भरणारी ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, नैसर्गिक पातळीवर कलाप्रदर्शने भरवून दिग्गजांकडून अक्षरशः वाहवा मिळवली. प्रत्येक वेळी अनेक मोठं मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये कलाप्रदर्शने घेणे शक्य नाही म्हणून अर्जुन माचिवले सरांनी व निष्ठावंत कलाकारांनी ग्रुपद्वारे स्वतःचे व्यासपीठ मिळावे, म्हणून आर्ट व्हिजनची व्यापक दृष्टिकोनातून स्थापना.

गेली १० वर्षे सातत्याने हे कलाप्रदर्शन होत असल्यामुळे अयोजकांमध्ये व प्रामुख्याने रसिक कलाप्रेमी यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कलाप्रदर्शनाला महाराष्ट्रातून रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूरसह व खूद्द मुंबई शहरांतील कलाप्रेमीपासून ते अगदी खेडेगावातील चित्रकार हिरीरीने यामध्ये सहभागी होतात. जगभरातून अनेक कलारसिक तसेच कलाप्रेमी या कलाप्रदर्शनाचा लाभ घेतात हे विशेष. अनेक मोठमोठी वृत्तपत्र, वाहिन्यांनीही या प्रदर्शनाची आवर्जून दखल घेऊन कलाकारांना आत्मविश्वास देतात. कौतुक करतात. कलेचा आविष्कार करतात.

यावर्षी प्रदर्शनामध्ये नाविन्यता आणण्यासाठी कला शिक्षक, आर्टिस्ट त्याचबरोबर विद्यार्थी ,काही निवडक शाळादेखील या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांना व शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना व निवडक व्यक्तींना राजा रवि वर्मा पुरस्कार देऊन या प्रदर्शनात गौरविण्यात येणार आहे.

या कालाप्रदर्शनाला राज्यभरातून कला क्षेत्रातील नामांकित मान्यवर तसेच राजकीय क्षेत्रातील कलाप्रेमी मान्यवर भेटी देत असतात.यामध्ये काही ‌नामांकित कंपन्याही आहेत. कलाकारांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून प्रोत्साहनपर मदत देण्याचा प्रयत्न यातून अनेकजण करतात. कला ही जीवनाची सावली आहे, कलेचा विकास व्हावा, कला ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी व जास्तीत जास्त लोकांनी तिचा आस्वाद घ्यावा हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.

कलाकार हा नेहमीच उपेक्षित असतो. त्याला प्रसिद्धी मिळावी व त्यांच्या रोजीरोटीसाठी प्रश्न मार्गी लावला जावा,या उद्देशाने सुद्धा हे प्रदर्शन मांडले जाते.या प्रदर्शनातून ज्या चित्रांची विक्री होते.त्या विक्री झालेल्या चित्रांच्या रकमेतून होतकरू कलाकारांना आर्थिक पाठबळ मिळते.अशा अनेक प्रकारच्या हेतूंनी हे प्रदर्शन सुंदरतेने संपन्न होत असते.
कलेला झोकून देणारे,कलेची आराधना करणारे,कला जगवणारे,कलेशी मैत्री करणारे,कलेला सावली मानून अनेकांचे कलेतून जीवन फुलवण्यासाठी अहोरात्र झटणारे, स्वतः पदरमोड करून विद्यार्थ्यांना कलेसाठी प्रेरित करणारे,आपल्या संस्कृतीला जोपासणारे, सर्व स्तरातील चित्र रेखाटून नावलौकिक संपादन केलेले,कलेला छंद मानणारे, हरहुन्नरी नि जातीवंत चित्रकार म्हणून अर्जुन धाकू माचिवले सरांकडे पाहिले जाते. हे त्यांनी कष्टातून व जिद्दीतून मिळविलेले मोठे यश कोणालाही नाकारता येणार नाही.अर्जुन माचिवले सर आणि त्यांची टीम यशाच्या शिखराकडे मार्गक्रमण करताना दिसत आहेत.

१० वर्षांपूर्वी लावलेले कलेचे इवलेसे रोप आज त्याचा वटवृक्ष झाल्याचे समाधान आयोजकांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. या प्रदर्शनाचा जरूर लाभ घेण्याचे आवाहन प्रख्यात चित्रकार अर्जुन माचिवले सर व त्यांच्या सहकारी चित्रकारांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 20-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here