गुहागर येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आजपासून वर्धापन दिन सोहळा

0

गुहागर : शहरातील वरचापाट येथील श्री दुर्गादेवीच्या १५ व्या वर्धापन सोहळ्याला गुरुवारपासून (दि. २१) सुरुवात होत आहे. दोन वर्षे कोरोना संकटामुळे वर्धापन दिनाचे आयोजन करणे शक्य नव्हते. म्हणूनच यावर्षी नवरात्रीप्रमाणे १० दिवस धार्मिक, सांगीतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती श्री दुगदिवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली.

वर्धापन दिनानिमित्त दररोज श्रींची महापूजा, सप्तशती पाठवाचन, महानैवेद्य, सायंपूजा, गोंधळ, आरती व मंत्रपुष्प असे कार्यक्रम होतील. श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव दि.२३ एप्रिल, २९ एप्रिल, १ व ३मे या दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. गुरुवारी रात्री ९.३० वाजता ह.भ.प. आदिती वैद्य आणि ह.भ.प. सायली मुळे यांची कीर्तन जुगलबंदी, शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा. महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, तर शनिवारी दुर्गाश्री संगीत मैफल, रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

सोमवर २५ राती ९.३० वा. कलारंग नाट्यप्रतिष्ठान वरवडे यांचा वाऱ्यावरती वरात व मंगळवारी रात्री ९.३० वा. संगीत जय जय गोरीशंकर या नाट्यकलाकृती होणार आहेत. बुधवारी रात्री ८ वा. होतकरू मुलींना शैक्षणिक मदत आणि मातांचा सन्मान होणार आहे.

दि. २८ रोजी तिरंगी भजन होणार आहे. दि. २९ रोजी स्तोत्रवर्धिनी हा आद्य शंकराचार्य रचित स्तोत्रगायनाचा कार्यक्रम, दि. ३० एप्रिलला सायं. ४ वा. ग्रामदैवत भेट सोहळा व रात्री ८ वा. प्रथमेश लघाटे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी १ मे रोजी सकाळी सहस्रचंडी पूर्णाहुती, महाप्रसाद आणि रात्री स्वरांगण हा सागीतिक कार्यक्रम होईल, अशी माहिती श्री. खरे यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 21-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here