वीज बिल अनामत न भरण्याचे चिपळूण व्यापारी महासंघटनेचे आवाहन

0

चिपळूण : वीज बिलासोबत आलेली अनामत भरू नये, असे आवाहन चिपळूण व्यापारी महासंघटनेने चिपळूणमधील व्यापाऱ्यांना केले आहे. याबाबत चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी महावितरणच्या कारभारात सुधारणा न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे.

गेली दोन वर्षे करोना आणि महापुराने व्यापारी, नागरिक, महिला असे समाजातील सर्वच घटक अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. अनेक घरात करोनाचे बळी गेले आहेत. व्यापारीवर्ग तर कोलमडून पडलेला आहे.कसे तरी उभे राहण्याची त्यांची धडपड सुरू असतानाच जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार महावितरण कंपनीने केला आहे. वीजबिल भरताना आधीच सर्वजण बेजार झाले आहेत. अशावेळी महावितरणने अनामत रकमेसह बिले दिली आहेत. हा ग्राहकाला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्याविरोधात चिपळूणमधील व्यापारी एकवटले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 21-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here