सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
तसेच, ईडी आणि इनकम टॅक्सच्या रेडबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “माझ्या भावाच्या घरी कधीच ईडीची रेड झाली नाही, पण, माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय,” असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी गुडी पाढव्याच्या सभेत बोलताना, ‘अजित पवारांच्या घरावर इडीची रेड होते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही’, असा आरोप केला होता.
सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
त्या वक्तव्याबाबत बोलताना खासदार सुळे यांनी मोठा खुलासा केला. “माझ्या भावाच्या(अजित पवार) घरी कधीच रेड झालेली नाही. कदाचित त्या लोकांना(राज ठाकरे) कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यांचा बेसच चुकीचा आहे, त्यामुळे कंपॅरिझनचा प्रश्नच येत नाही. उलट मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण देते, त्यामुळे माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय,” असा मोठा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 21-Apr-22