‘राहुल गांधी यांनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं’ – भाजप

0

‘सरकारच्या असक्षमतेची मोठी किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागेल. तसेच सरकारने योग्य वेळी निर्णायक पाऊल उचललं नाही,’ असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला होता. याचाच धागा पकडत त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ‘संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. अ‍ॅडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच कोरोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे. कृपया याबद्दल अधिक माहितीसाठी कार्टून नेटवर्क सोडून न्यूज चॅनलवर जा’ असं ट्विट बिप्लब देब यांनी केलं आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here