‘घरडा इन्स्टिट्यूट’मध्ये २३ एप्रिल रोजी दीक्षांत समारंभ

0

चिपळूण : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये दि. २३ एप्रिल रोजी शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगाचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी यांचेदेखील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

या सोहळ्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पदवी प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाखेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक देण्यात येणार आहे.

सोहळ्यास घरडा फाऊंडेशनचे विश्वस्त, घरडा केमिकल्स कंपनीचे अधिकारी, अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी, अनेक शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य आदींची उपस्थिती लाभणार आहे.

दुपारी ३ ते ४ या वेळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सायंकाळी ४ वाजता दीक्षांत समारंभाला सुरुवात होईल.

या समारंभानंतर जीआयटीमधील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडेल. सर्व विद्यार्थ्यांना पांढऱ्या रंगाचा भारतीय पोशाख हा ड्रेस कोड असेल तर महाविद्यालयातर्फे प्रत्येकाला सुरुवातीला नोंदणीच्या वेळी उत्तरीय (stole) देण्यात येणार आहे, जे प्रत्येकाने परिधान करावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here