सिल्व्हर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ महिलांना भेटायचंय, वेदना जाणून घ्यायच्यात : सुप्रिया सुळे

0

सोलापूर : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. एसटी कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या महिलांनी आक्रोश केला होता. या आंदोलकांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सामोऱ्या गेल्या होत्या. मात्र, काही केल्या आंदोलक माघार घेण्यास तयार नव्हते. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. सिल्व्हर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ महिलांना भेटण्याची इच्छा आहे. त्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांना सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनाबाबत विचारण्यात आले. अशा स्वरूपाचे आंदोलन अथवा हल्ला यापूर्वी कधी झाला नव्हता. कदाचित आंदोलनाची ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. पण कुणी भडकवले ते पाहावे लागेल. या आंदोलनाच्यानिमित्ताने ज्या २२ जणींनी आपला आक्रोश व्यक्त केला, त्यांना भेटायचे असून, त्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:06 PM 21-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here