आधुनिक सॅलोन इन्स्टिट्युटला एन एस डी सी चे मानांकन प्राप्त

0

रत्नागिरी : शहरातील आधुनिक सॅलोन च्या इन्स्टिट्युटला युवा परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून एन एस डी सी चे मानांकन प्राप्त झाले असून ए टी सी सी चे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हेच प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, नाभिक समाज संघटनेचे अध्‍यक्ष श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. सुप्रिया भागवत तसेच युवा परिवर्तनचे वरिष्ठ व्यवस्थापक दत्तात्रेय परुळेकर, व्यवसाय विकास व्यवस्थापक दीपक कुडाळकर, रत्नागिरी जिल्हा प्रमुख वृषाली सुर्वे उपस्थित होते.

मान्यवारांच्या हस्ते आधुनिक सॅलोन च्या इन्स्टिट्युटचे सर्वेसर्वा मंदार पवार, मनिष पवार, आसावरी पवार आणि श्वेता पवार यांना हे प्रदान करण्यात आले. यामुळे आता आधुनिक इन्स्टिट्युट च्या माध्यमातून हेअर, स्किन आणि मेकअप यावर विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 22-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here