कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू

0

▪ पाच पेक्षा अधिकजण जेथे एकत्र येतात अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

IMG-20220514-WA0009

▪ जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हयातील योगा/नृत्य व इतर क्लासेस, अभ्यासीका, लग्न व अन्य समारंभांची सभागृहे, कम्युनिटी सेंटर, जनरल स्टोअर, पानपटी, कॉफी/ज्युस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलीव्हरी वगळून) व इतर सर्व दुकान आस्थापना जेथे पाच पेक्षा जास्त लोक एकाच वेळी एकत्रित येत आहेत, हे साथ रोग प्रतिबंधत्मक कायदा 1897 अन्वये दिनांक 19 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत

▪ हा आदेश कुणाला लागू नाही ?
अत्यावश्यक वस्तुं विक्रेते उदा. किराणा सामान (Grocery), दुध, भाजीपाला, फळे व औषधालये (Chemist Shop) यासाठी सदरचा आदेश लागू होणार नाही.

▪ आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 कलम 51 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here