”माल्या आणि नीरव मोदीला भारताला सोपवण्यास तयार” : बोरिस जॉन्सन

0

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी मोठं वक्तव्य केले आहे. बोरिस जॉनसन यांना नीरव मोदी आणि विजय माल्याबाबात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ‘कायदा मोडणाऱ्यांना ब्रिटनमध्ये थारा नाही.

आम्ही नीरव मोदी आणि विजय माल्या यांना भारताकडे सोपवण्यास तयार आहोत. त्यासाठी सर्व मदत करण्यास तयार आहोत. ‘ भारतासोबतचे संबंध आणखी घट्ट झाल्याचेही यावेळी बोरिस जॉनसन म्हणाले.

नीरव मोदी आणि विजय माल्या यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर बोरिस जॉनसन म्हणाले की, ‘तुम्ही ज्या दोन व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला आहेत. त्यांना आम्ही भारतात पाठवू इश्चितो. पण काही कायद्याच्या अडचणी येत आहे. कायदा मोडून येणाऱ्याचं आम्ही कधीही स्वागत केलेले नाही.’ यावेळी बोलताना बोरिस जॉनसन यांनी ब्रिटनमध्ये सक्रिय असलेल्या खलिस्थानी संघटनाबाबतही स्पष्ट सांगितले. ते म्हणाले की, ‘खलिस्थानी संघटनांचा बिमोड करण्यासाठी दहशतवादविरोधी टास्क फोर्स नेमल्या आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल.’

बोरिस जॉनसन यांना युक्रेन-रशिया युद्धावरही प्रश्न विचारण्यात आले. पुढील आठवड्यात कीवमध्ये ब्रिटनचं दूतावास सुरु करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना बोरिस जॉनसन यांनी रशियाने मोरियूपोल येथे केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मोरियूपोल येथे ज्या पद्धतीने कारवाई केली, ती पूर्णपणे चुकीची आहे. पुन्हा एकदा आम्ही कीवमध्ये ब्रिटनचे दुतावास सुरु करण्यात येणार आहे.

भारत आणि रशिया यांच्या संबंधावरही बोरिस जॉनसन यांनी आपलं मत व्यक्त केले. भारत आणि रशिया यांचे पूर्वीपासून संबंध आहेत. रशियाबाबत भारताचं जे स्टँड आहे, ते सर्वांना पहिल्यापासूनच माहित आहे. यापुढेही भारताचा स्टँड बदलणार नाही, असे जॉनसन म्हणाले. रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारत आणि ब्रिटनचा स्टँड वेगळा आहे. पण भारतासोबतचे ब्रिटनचे संबंध घट्ट असल्याचे सांगायालाही यावेळी बोरिस जॉनसन विसरले नाहीत. तसेच यावेळी जॉनसन म्हणाले की, 2050 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:18 PM 22-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here