मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल

0

मुंबई : कितीही विरोध झाला तरी उद्या सकाळी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला.

आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही १०० वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही असेही रवी राणा यांनी म्हटले.

मातोश्रीबाहेर आज सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलं होतं. शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या सर्व शिवसैनिकांचे हात जोडून आभार मानले.

दरम्यान, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. दहशतवादी नाही. आम्ही काही शस्त्र हातात घेऊन मातोश्रीवर जात नाहीय. आम्ही तर हनुमान चालीसा घेऊन जाणार आहोत. शिवसैनिकांनी आम्हाला आव्हान दिलं. तुमचा हनुमान चालीसाला विरोधा का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच”, असं नवनीत राणा यांनी म्हटलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:18 PM 22-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here