फाटक हायस्कूलला शताब्दी महोत्सवानिमित्त एसएससी बॅच 1999 कडून पाच लाख चाळीस हजारांची देणगी

0

रत्नागिरी : दिनांक 21 एप्रिल 2022 दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित एस. एस. सी. बॅच 1999 च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी आतापर्यत 5,40,000 (पाच लाख चाळीस हजार ) रुपयांची देणगी ऑनलाईन पद्धतीने संस्थेकडे ट्रान्सफर केली.

माजी विद्यार्थ्यांनी रोख रक्कम किंवा चेक न देता ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या या आगळ्यावेगळ्या देणगीचे कौतुक होत आहे.

यानिमित 1999 बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शाळा व संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, उपाध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर, उपकार्याध्यक्ष अॅड. सचिन शिंदे, सचिव श्री. राजीव गोगटे, कौन्सिल सदस्य श्री. दिलीप भातडे, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री. किशोर लेले आणि 1999 च्या एसएससी बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते.

मार्च २०२२ रोजी शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून शाळेची दिमाखात शतकोतर वाटचाल सुरू आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट द्यावी यासाठी संस्थेने विविध कार्यक्रमांचे आयोजन शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने केले. या शताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून 1999 च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना संपर्क साधून ऑनलाइन पद्धतीने संस्थेच्या खात्यात देणगी जमा केली.

यापुढेही देणगीचा ओघ असाच चालू राहणार असल्याचे श्री. रश्मीन दुर्वे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. करिअरची निवड करताना इंजिनीअरिंग, मेडिकल आणि सीए यापेक्षा छोट्या छोट्या व्यवसायांची माहिती विदयार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर द्यावी की ज्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतील आणि जीवनात यशस्वी होतील. यासाठी आम्ही मदत करायला तयार असल्याचे याप्रसंगी डॉ. श्री .वैभव कानडे यांनी सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मनोदय असल्याचे संस्थाध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर यांनी सांगितले तसेच 1999 च्या एसएससी बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. देणगी बद्दल ऋण व्यक्त केले. व्यावसायिक शिक्षणाची माहिती देण्याची ग्वाही मा. मुख्याध्यापक यांनी दिली.

यावेळी 1999 चा बॅचचे डॉ. वैभव कानडे, श्री. रश्मिन दुर्वे, श्री. कुणाल मलुष्टे, श्री. स्वप्निल पटवर्धन, श्री. सहृद प्रभुदेसाई, श्री. केदार कोरगांवकर हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:37 PM 22-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here