जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंबपकर यांची पदोन्नतीने गडचिरोलीत बदली

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ओंकार अंबपकर यांची पदोन्नतीने गडचिरोली जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यातच ते बदलीने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात रुजू झाले होते.

उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ओंकार अंबपकर पदोन्नतीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) झाले आहेत. मागील ऑक्टोबर महिन्यात ते अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातून रत्नागिरी जिल्हा परिषदेत बदलीने हजर झाले होते. आता त्यांची पदोन्नती झाली असून मुख्य व लेखा वित्त अधिकारी या पदोन्नतीने गडचिरोली जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. रत्नागिरी जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांच्यासह सहकारी अधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:54 PM 22-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here