मोटारचालकाचा ताबा सुटून मोटार खोल दरीत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

0

➡ रत्नागिरीतील तिघांचा समावेश

IMG-20220514-WA0009

पोलें तर्फ ठाणे : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ – घाटातील चढतीच्या मार्गावरील शेवटच्या वळणावर मोटारचालकाचा ताबा सुटून मोटार पन्नास फूट खोल दरीत कोसळली. दैव बलवत्तर म्हणून मोटारीतील पाचही प्रवासी जखमी झाले. काल रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. मोटार पलटी होऊन पडल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढताना कसरत करावी लागली. या अपघाताची सीपीआर चौकीत नोंद करण्यात आली आहे. चालक आदित्य भीमराव चव्हाण (वय ३८), दीपाली आदित्य चव्हाण (वय ३४), अमर आदित्य चव्हाण (वय १७ सर्व रा. साठरे बाबर जि. रत्नागिरी) तर बाबासो धोंडिराम आगलावे (वय ३०), आक्काताई दगडू पाटील (वय ४५ दोघेजण रा. आंबर्डे, (ता.शाहूवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here