लोडशेडिंगविरोधात भाजपचं आजपासून सलग 7 दिवस राज्यव्यापी आंदोलन

0

मुंबई : राज्यातील वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार आहे. राज्यात अघोषित भारनियमन सुरू आहे. असे असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. ही सक्तीची वसुली ताबडतोब थांबवावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. माजी ऊर्जामंत्री, आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, तीन आठवड्यांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्याच्या काही भागांत तब्बल सहा तास वीज नसल्याने जनता बेहाल झाली आहे. ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळसाटंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना राज्य भारनियमनमुक्त झाले होते. आता आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असा आरोपही त्यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:54 AM 23-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here