रत्नागिरी : शहरातील जे. के. फाईल्स येथील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या विनापरवाना जुगार अड्यावर पोलिसांनी धाड टाकून साहित्य व रोख रक्कम जप्त केली. ही घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जे. के. फाईल्स येथील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना जुगार चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईत कल्याण मटका जुगार खेळ खेळवित असताना संशयित आढळला. त्याच्याकडील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. संशयितावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुर्वे करत आहेत.
