या दोघांनीच धर्म सांभाळण्याचा मक्ता घेतलाय का?; गृहमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला सुनावलं

0

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मात्र, यावरून मुंबईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस आपले काम योग्य पद्धतीने करत आहेत. राणा दाम्पत्याने समजूतीने भूमिका घ्यावी. कायदा-सुव्यवस्था सुरक्षित राहावी, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, रवी राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा घराबाहेर पडणार असल्याचे समजताच शिवसैनिक आक्रमक झाले. राणा यांच्या इमारतीसमोरील बॅरिकेटिंग तोडून आत जाण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले असून, तणाव कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. काही झाले तरी मातोश्रीवर जाणारच अशी ठाम भूमिका राणा दाम्पत्याची आहे. पोलीस शिवसेनेच्या दबावाखाली काम करत असल्याचे आरोपही नवनीत राणा यांनी केला आहे. या एकूणच परिस्थितीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी स्पष्ट भाष्य करत राणा दाम्पत्याला सुनावले आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. नेमके काय म्हणाले दिलीप-वळसे पाटील, ते जाणून घ्या…

पाठीमागे कुणीतरी असणार, कुणाची तरी सुपारी घेतली असणार

– त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपापल्या घरात वाचावी.

– दुसऱ्याच्या घरात जाऊन विनाकारण ड्रामा करायची गरज नाही

– मातोश्रीवर जाऊन शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये

– परिस्थिती तणावपूर्ण होईल असं काम करू नये

– पुढे काय करायचं ते पोलिसांना माहीत आहे, पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत

– वरिष्ठ अधिकारी माझ्या संपर्कातही आहेत, शांततेने मार्ग निघेल अस बघा, असे सांगितले आहे

– किती लोकांनी समजवायचं राणा दाम्पत्याला, विनाकारण मेलो ड्रामा सुरू आहे

– धर्माचा आदर असणारे, प्रेम करणारे कमी आहेत का, या दोघांनीच धर्म सांभाळण्याचा मक्ता घेतला आहे का?

– राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे हे दाखवणं हाच त्यांचा हेतू

– राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राणा दाम्पत्य जबाबदार असेल

– पाठीमागे कुणीतरी असणार, कुणाची तरी सुपारी घेतली असणार

– कोण मागे आहे याचा शोध घ्यावा लागेल.

– स्वतःहून ते इतके धाडस करू शकत नाहीत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:39 AM 23-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here