कोंडगाव येथील कॉजवेला भगदाड

0

साखरपा : कोंडगाव येथील बौद्धवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावरील कॉजवेला भलेमोठे भगदाड पडले आहे. यामुळे हा रस्ता येत्या पावसाळ्यात धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोंडगाव येथील बौद्धवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर हा कॉजवे आहे. हा कॉजवे एका ओढ्यावर बांधण्यात आला असून त्या ओढ्यातून धरणाचे पाणी वाहत असते. त्यामुळे या ओढ्यातून पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह मोठा असतो. याच ओढ्यावर बांधण्यात आलेल्या कॉजवेसाथी वापरण्यात आलेल्या पाईपमधील अंतर तुलनेने जास्त आहे. त्यामुळे मधील भराव वाहून गेल्यामुळे कॉजवेला भगदाड पडले आहे.

येत्या पावसाळ्यापूर्वी हे भगदाड न भरल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here