गणेशगुळेतील क्रिकेट स्पर्धेत मनोरंजन चिंचखरी संघाला सरपंच चषक; मुरुगवाडा संघ उपविजयी

0

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे ‘सरपंच चषक २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गणेशगुळे-कुर्धे फ्रेंड्स सर्कलच्या वतीने केले आले होते. यामध्ये मनोरंजन चिंचखरी संघाने विजेतेपद, तर फाईट क्लब, मुरूगवाडा संघाने उपविजेतपद मिळवले.

बक्षीस वितरण रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या मनोरंजन चिंचखरी संघाला एकवीस हजार व ट्रॉफी, तर उपविजेत्या फाइट क्लब, मुरुगवाडा संघाला पंधरा हजार व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत गणेशगुळे सरपंच संदीप शिंदे यांनी गावातील कॅन्सरग्रस्त तीन गरीब कुटुंबांसाठी पन्नास हजार रुपये मदत केली. माजी आमदार बाळ माने, प्रा. नाना शिंदे, सुशांत चवंडे, अशोक वाडेकर, सुशांत पाटकर, दीपक शिंदे, गणेशगुळेचे सरपंच संदीप शिंदे व गणेशगुळे, कुर्धे येथील क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here