परदेशी प्रवासी विमानांना २२ मार्चपासून आठवडाभर भारत बंदी : केंद्रसरकार

0

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवासी विमानांना २२ मार्चपर्यंत भारतात येणास बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने आज (गुरुवारी) हा निर्णय घेतला आहे. कोरोनाने जगभरात हाहाःकार उडवला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण याच वयोगटातील व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग लवकर होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here