ॲथलेटिक्स स्पर्धेत रत्नागिरीची ‘सुवर्ण’ कामगिरी

0

रत्नागिरी – पुणे येथे सुरू असलेल्या पुरुष व महीला राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यांने सलग तिसऱ्या दिवशी सुवर्णपदक पटकावले.
पुणे येथे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत पुरुष व महीला राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा ३३ जणांचा संघ सहभागी झाला आहे.
आज तिसऱ्या दिवशी संदीप जोयशी याने पुरुष गटात १५०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ही कामगिरी करताना त्याने ३ मिनिट ५१ सेकंद वेळ नोंदविली. आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
काल दिनांक २२ एप्रिल रोजी क्रांती म्हसकर हिने २० वर्षांखालील मुलींच्या गटात लांब उडीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करताना ५.११ मीटर उडी मारली.
पहिल्या दिवशी झालेल्या उंच उडी स्पर्धेत रत्नागिरीच्या शीतल पिंजरे हिने १.६५ मीटर उंच उडी मारून सुवर्ण पदक पटकावले होते.
शीतल, क्रांती आणि संदीप यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here