आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीही कोरोनासमोर संभ्रमित

0


कोरोना विषाणूचा जगभरातील प्रादुर्भाव ही अपवादात्मक समस्या आहे .त्यावर सध्या तरी कोणताही ठोस उपाय सापडत नाहीय. अशी हताश प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी ) व्यक्त केली आहे.तोंडावर आलेल्या जपानमधील टोकियो ऑलिम्पिक आयोजनाबाबत ऑलिम्पिक समिती सध्या शेक्सपिअरप्रमाणे ‘टू बी ऑर नॉट टू बी ‘(जगावे कि मरावे) अशा द्विधा मनस्थितीत सापडली आहे. कारण जगभरातील खेळाडूंचे आरोग्य कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाच्या तोंडी देणे समितीला परवडणारे नाहीय.शिवाय टोकियो ऑलिम्पिकची पूर्वतयारी पूर्ण होत आली असल्याने अजूनही ऑलिम्पिक घेण्यासारखी परिस्थिती येईल असा आशावाद संयोजन समिती बाळगून आहे. ‘कोरोनासारखी अपवादात्मक समस्या सध्या उद्भवली आहे. त्यावर कोणताही ठोस उपाय नाही. खेळाडूंचे आरोग्य हे ‘आयओसी’साठी महत्त्वाचे आहे,” असे ‘आयओसी’च्या प्रवक्त्यांने सांगितले टोकियो ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे जुलैपासून होणार की नाही, यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची प्रतिष्ठा राखण्याचे आणि खेळाडूंचे आरोग्य जपण्याचे मुख्य आव्हान आहे. सद्यस्थितीत कोणताही पर्याय सापडत नाही,” असे ‘आयओसी’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. ‘आयओसी’च्या आतापर्यंतच्या धोरणाबाबत ऑलिम्पिक पोल वॉल्ट विजेती कॅटरिना स्टेफॅनिडी हिने नाराजी व्यक्त केली होती. ”आयओसी खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ करत आहे. चार महिन्यानंतर होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नाही तर आतापासूनच खेळाडूंचे आरोग्य धोक्यात घालत आहे,” असा आरोप स्टेफॅनिडीने केला होता. जागतिक स्तरावरील अन्य खेळाडूंनीही ‘आयओसी’च्या वेळेत ऑलिम्पिक आयोजनाबाबतच्या प्रयत्नाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेची जबाबदारीही ‘आयओसी’ची

कोरोनामुळे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेइतक्याच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. कोणताही खेळाडू आधी पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करतो. या स्थितीत ज्या खेळांच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द होत आहेत किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत, त्यांची यशस्वीपणे आयोजनाची जबाबदारी ही आमची आहे, असे ‘आयओसीने’ स्पष्ट केले.पात्रता स्पर्धांचे आयोजन कोरोनासारख्या जागतिक महामारीत करणे हे आयओसीपुढील खडतर आव्हान बनले आहे.

‘कोरोना’च्या धसक्याने आयओए कार्यालयाला कुलूप
कोरोना व्हायरसचा प्रचंड धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. यामध्ये क्रीडा संघटनाही मागे नाहीत. कोरोनाच्या भितीमुळे गुरुवारी हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेने आपल्या ऑफिसला टाळे लावले आहे. ऑलिम्पक ही स्पर्धा चार वर्षांनी खेळवली जाते. ही स्पर्धा यंदा २०२० साली जपानमधील टोकिओ या शहरात होणार आहे. स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकची तयारी आताच करावी लागणार आहे. पण कोरोनापासून वाचण्यासाठी हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेने आपल्या ऑफिसलाच कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाबाधित लोकांची संख्या हिंदुस्थानातही वाढताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेने आपले ऑफिसच बंद केले आहे. त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांना घरामधून काम करण्यास सांगितले आहे. अन्य क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रावर कोरोनाचा परिणाम दिसत आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा स्थगित केल्या गेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here