दाभोळ येथे बालकाची गळफास घेत आत्महत्या

0

दापोली : तालुक्यातील दाभोळ येथील रुद्र विनायक पदुकले वय वर्षे १२ याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

या मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील दाभोळ टेमकर वाडी वरचा विभाग येथे राहणारा रुद्र विनायक पदुकले (१२) याने २२ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या समारास आपल्या राहत्या घरी भालाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हा इयत्ता पाचवीत शिकत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास लक्ष्मी विठ्ठल पदुकले रुद्रची आजी हिला आपला नातू भालाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या बालकाला उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे पुढील प्रक्रियेकरता दाखल करण्यात आले असून या घटनेचा संपूर्ण तपास दाभोळ पोलिस करीत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 25-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here