कोरोनाने घेतला भारतातला चौथा बळी

0

कोरोनामुळे पंजाबमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचलीय. याआधी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पंजाबमध्ये एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच जर्मनीहून इटलीमार्गे परतली होती. पंजाबमधल्या नवानशहर जिल्ह्यातल्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. छातीत तीव्र वेदना होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here